एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून मुसळधार पावसातही नवी मुंबईची 'तुंबई' होत नाही...
नवी मुंबई महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी 11 होल्डिंग पाँड आणि 192 मिलीमीटर पाईप बसवल्यामुळे पाणी तुंबत नसल्याचं समोर आलं आहे.
नवी मुंबई : मुंबईची 'तुंबई' झाली असताना मुसळधार पावसातही नवी मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे. महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी 11 होल्डिंग पाँड आणि 192 मिलीमीटर पाईप बसवल्यामुळे पाणी तुंबत नसल्याचं समोर आलं आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच बाजूलाच असलेल्या नवी मुंबई शहरात मात्र जोराचा पाऊस होऊनही फारसा परिणाम झालेला नाही. मुंबईत कमरेच्या वर पाणी भरलेलं असताना नवी मुंबईत गुडघाभरही पाणी साचत नाही.
महापालिका प्रशासनाने उभारलेल्या 11 होल्डिंग पाँडमुळे ही किमया झाली आहे. शहरात 192 मिमी बसवलेल्या ड्रेनेज पाईप लाईनमुळेच शहरात कुठेही पाणी साचल्याच्या घटना घडत नाहीत.
पावसाने मुंबईत हाहाकार माजवला असताना नवी मुंबई शहर मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत आहे. शहरात पाणी साठत नसल्यामुळे इथे पाऊस पडत नाही का, असा आश्चर्यकारक प्रश्नही काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी पाणी न साचण्याचं कारण आहे महानगरपालिकेने केलेलं योग्य नियोजन आणि वर्षभर राखलेली इंफ्रास्ट्रक्चरची निगा.
शहरात पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी 11 होल्डिंग पाँड उभारण्यात आले आहेत. शहरात पडलेल्या पावसाचं पाणी या होल्डिंग पाँडमध्ये साठवलं जातं. समुद्राला भरती असताना या होल्डिंग पाँडचे दरवाजे आतून बंद होत असल्यामुळे समुद्राचं पाणी शहरात शिरत नाही. भरती ओसरल्यानंतर शहरातील होल्डिंग पाँडमध्ये साठलेलं पाणी समुद्र, खाडीत फेकलं जातं. यामुळे गटार, नाले रिकामे होऊन शहरात पाणी साठून राहत नाही.
सिडकोने नवी मुंबई शहर हे योग्य नियोजन करुन वसवलं असतानाच महापालिकेने भर टाकून आधुनिक शहराचा टच दिला आहे. पालिकेने 192 मिलीमीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ड्रेनेज लाईन बसवल्या असल्याने 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरी कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत नाही. त्याचबरोबर या ड्रेनेज लाईनचे काम करताना यात टेलिफोन, गॅस, वीज यांच्या लाईन येऊ दिलेल्या नाहीत, याचाही फायदा पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement