एक्स्प्लोर
जसप्रीत बुमराह आणि 'ही' अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये?
टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला अभिनेत्रीने क्लीन बोल्ड केलं आहे.

मुंबई: टीम इंडियाचे क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेमप्रकरणं काही नवी नाहीत. नुकतंच कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लगीनगाठ बांधली. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री अली अवराम यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा सुरु असतानाच, आता टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला अभिनेत्रीने क्लीन बोल्ड केलं आहे. तेलुगु अभिनेत्री राशी खन्ना आणि जसप्रीत बुमराह रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. राशी खन्ना ‘मद्रास कॅफे’ या सिनेमात जॉन अब्राहमसोबत दिसली होती. राशी आणि बुमराहच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु असली, तरी दोघांनीही याबाबत गुप्तता पाळली आहे. काही दिवसांपूर्वी राशी बुमराहसोबतच्या अफेयरबाबात म्हणाली होती, “माझी त्याच्याशी वैयक्तिक ओळख नाही. मी त्याला कधी भेटलेही नाही. तो एक क्रिकेटर आहे इतकंच मला माहित आहे”.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट























