एक्स्प्लोर

अपत्यप्राप्तीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, बंगाली भोंदूबाबाला अटक

अजय हरिपद चौधरी असे बंगाली भोंदूबाबाचे नाव आहे. विरार पूर्व परमात्मा पार्क, एच 10 चंदनसार या ठिकाणी मागच्या 10 वर्षांपासून या बाबाने आपलं दुकान थाटलं होतं. हा बाबा मूळचा पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील वीरभूम जिल्ह्यातील इसकपुरचा राहणारा आहे. मंगळवार आणि शुक्रवारी यांच्या अंगात कालिका माता संचारते म्हणून परिसरातील अनेक महिला आणि पुरुष त्याच्याकडे आपली पीडा घालवण्यासाठी येत होत्या.

विरार :  अपत्यप्राप्तीसाठी बंगाली भोंदू बाबाने विरारमधील एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कालिका मातेचा कोप झालाय, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून बलात्कार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हरिपद चौधरी असे बंगाली भोंदूबाबाचे नाव आहे. विरार पूर्व परमात्मा पार्क, एच 10 चंदनसार या ठिकाणी मागच्या 10 वर्षांपासून या बाबाने आपलं दुकान थाटलं होतं.  हा बाबा मूळचा पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील वीरभूम जिल्ह्यातील इसकपुरचा राहणारा आहे. मंगळवार आणि शुक्रवारी यांच्या अंगात कालिका माता संचारते म्हणून परिसरातील अनेक महिला आणि पुरुष त्याच्याकडे आपली पीडा घालवण्यासाठी येत होत्या. एका 37 वर्षीय पीडित महिलेला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे ती या भोंदू बंगाली बाबाकडे गेली होती. तेव्हा तुझ्यावर कालिका मातेचा कोप झाला आहे असे सांगून तिच्यावर अघोरी विद्या करून आणि तिला बेशुद्ध करून मे 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. ही घटना कुणाला सांगितली तर तुझ्यावर कालिका मातेचा कोप होईल आणि तुझ्या संसाराचा नाश होईल, अशी धमकीही हा बंगाली बाबा देत होता. शेवटी आपली फसवणूक झाली असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यावर तिने 9 नोव्हेंबर रोजी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

Embed widget