Raj Thackeray : एकदा सत्ता हातात द्या, पोलिसांना मुंबई 'साफ' करण्यासाठी 48 तास देईन, सगळ्यांना सडकून काढेन : राज ठाकरे
Raj Thackeray Worli Speech : कोळी बांधव इथला राजा आहे, तुम्ही रडायचं नाही तर रडवायचं असं आवाहन राज ठाकरे यांनी वरळीकरांना केलं.
मुंबई : मुंबई पोलिसांवर माझा 100 टक्के विश्वास आहे, माझी सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना मुंबई साफ करण्यासाठी 48 तास देईन, सगळ्यांना सडकून काढेन असं राज ठाकरे म्हणाले. इथले कोळी बांधव हे मुंबईचे राजे आहेत, तुम्ही रडायचं नाही तर बाहेरून येणाऱ्यांना रडवायचं असंही राज ठाकरे म्हणाले. माझ्या हाती सत्ता द्या, पहिल्या 48 तासांमध्ये राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार असंही ते म्हणाले. राज ठाकरेंनी वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचार सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, आझाद मैदानावर पोलिसांवर हात टाकण्यात आले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी पोलिसांना कमिशनरने आदेश दिला होता, काही झालं तरी लोकांवर हात उचलू नका. एकदा या राज ठाकरेंच्या हाती सत्ता द्या, यांना सडकून काढतो.
वरळीतील कोळीवाड्यावर बिल्डरांचे लक्ष
वरळीतील कोळीवाड्यावर बिल्डरांचे लक्ष असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, माझी कोळी बांधवांना विनंती आहे, तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाही. तो जमिनीवरून येणार आहे. त्याकडे लक्ष द्या. बोलता बोलता कधी तुमच्या जमिनी घेतल्या जातील हे समजणार नाही.
माझ्याकडे तुमच्या तक्रारी आल्या पाहिजेत
राज ठाकरे म्हणाले की, "तुम्ही रडायचं नाही आणि इतर लोकांच्या तक्रारी घेऊन यायचं नाही. माझ्याकडे तुमच्या तक्रारी आल्या पाहिजेत. तुम्ही इथले राजे आहेत. बीडीडी चाळीचा प्रश्न किती वर्षे प्रलंबित आहे. पहिल्यांदा आपला इतिहास चाळा. तुम्ही कोण होतात? कोळी बांधव हा मुंबईचा मालक आहे. तुम्ही रडू नका. मी गेली अनेक वर्षे सांगतोय, मुंबईत लोकांचा लोंढा रोज येतोय."
हा देश सगळ्यांचा असल्याचं सांगितलं जातंय. पण काही कायदेही आहेत. जर एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात यायचं असेल तर पहिल्यांदा पोलिसांना त्याची माहिती द्यायची असते. मुंबईच्या पोलिसांवर माझा 100 टक्के विश्वास आहे. संपूर्ण सत्ता माझ्या हातात दिला तर पोलिसांना 48 तास देईन. ही मुंबई साफ करा असं सांगने असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीवेळी मौलवींनी फतवे काढले होते. मौलावी जर फतवे काढत असेल तर मीही आज फतवा काढतो. माझ्या सर्व उमेदवारांना मदत करा. पहिल्या 48 तासांत सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवतो. जास्त आंगावर याल तर या खाकी वर्दीला रझा अकादमीचा बदला घ्यायला सागंण्याचा आदेश देईन."
ही बातमी वाचा: