एक्स्प्लोर

महाराष्ट्राची सत्ता दिल्यास एकाही मशिदीवर भोंगा ठेवणार नाही, रस्ते अडवून पाडले जाणारे नमाज बंद, राज ठाकरेंचं सडेतोड भाषण

Raj Thackeray Ghatkopar Speech : आमची सत्ता आल्यास राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा ठेवणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. रस्ते अडवून पाडले जाणारे नमाज बंद करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

Raj Thackeray Ghatkopar Speech : मुंबईतील (Mumbai) सगळे टोल नाके बंद झाले आहेत. त्याबद्दल कोणीही बोलत नाहीत. इतर कोणत्याही राजकीय पक्षाने या मुद्दा उचलला नाही. कारण सगळ्यांचे हात त्या टोलमध्ये अडकले होते असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. सत्तेत नसताना आम्ही अनेक विषय मार्गी लावल्याचे राज ठाकरे म्हणाले. पुढच्या दोन दिवसात पक्षाचा जाहीरनामा येणार आहे. त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे आमची सत्ता आल्यास राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा ठेवणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. रस्ते अडवून पाडले जाणारे नमाज बंद करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंचं सरकार असताना आम्ही मशिदीवरील भोंगे आम्ही बंद केले. यावेळी 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही सांगितलं होतं, की त्यापुढे हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. पुण्यात एका मुस्लिम पत्रकाराने सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे.  मशिदीवर भोंगे काढण्याचा तुमचा निर्णय योग्य असल्याचे त्या पत्रकाराने सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. यामुळं लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पण मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत असेही राज ठाकरे म्हणाले. रेल्वे भरतीसाठी मनसेनं आंदोलन केलं, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरुणांना दिल्या जात होत्या.या परिक्षांची इंथ जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण? असा सवालही राज ठाकरेंनी केला. इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यांनी काय केलं? यावर संसदेत का कुणी बोललं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. जर हे महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर का निवडून द्यायचं यांना? असा सवालही त्यांनी केला.

मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर मराठी पाट्या दिसतायेत

मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर मराठी पाट्या दिसत आहेत असे राज ठाकरे म्हणाले. मोबाईल फोन कंपन्यांना दणका दिला, तेव्हा संदेश मराठीतून आले. मशिदींवरच्या भोग्यांसमोर हनुमान चालिसा लावली, त्यामुळं भोंगे वाजणे बंद झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. मशिदींवरच्या भोग्यांबाबत 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे ते म्हणाले. अनेक मुसलमानांनीही भोग्यांच्याविरोधात मनसेचं कौतुक केलं. तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता असेही राज ठाकरे म्हणाले.

सगळ्या शहरांचा विचका झालाय

ज्यावेळी आंदोलन केलं, त्यावेळी प्रत्येक आंदोलन तडीस नेल्याचे राज ठाकरे म्हणाले. सगळ्या शहरांचा विचका झालाय, त्याचे परीणाम आपण सोसतोय असेही राज ठाकरे म्हणाले. आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा समोर आणला आहे. 2006 ते 2014 कुठेही गेलो की प्रश्न विचारला जायचा की तुमच्या ब्लू प्रिंटचं काय झालं? असेही राज ठाकरे म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget