एक्स्प्लोर
मनसेचा आज संताप मोर्चा, मात्र अद्याप पोलिसांची परवानगी नाहीच!
Raj Thackeray(MNS) Mumbai Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे.
मुंबई : ल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणा हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.
हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्टेशनपर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चा सकाळी साडेअकरा वाजता सुरु होईल.
मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मनसेनं सोशल मीडियातूनही आवाहन केलं आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/915551684419399680
हा मोर्चा फक्त रेल्वे प्रशासनाविरोधात नाही तर इतर विषयांबाबतही असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. सध्या देशात एक अघोषित आणीबाणी आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.
‘सोन्यासारखी सत्ता जनतेने यांच्या हातात दिली, आधीच्या सरकारपेक्षा काही चांगलं घडेल असा आशावाद निर्माण झाला आणि तो त्यांनी इतक्या लवकर उद्धवस्त केला.’ अशी टीकाही मनसेनं सरकारवर केली आहे.
मनसेच्या या मोर्चाला आता नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
अद्याप पोलिसांची परवानगी नाही
एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.
मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. दरम्यान, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळं आता आज नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मोर्चा कसा असेल?
- सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
- राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
- महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
- चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
- राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
- चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement