एक्स्प्लोर
महाडचा 'देवदूत' बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार
मुंबई : महाड दुर्घटनेत देवदूत ठरलेल्या बसंत कुमारवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर सत्कार केला.
बसंत कुमारच्या समयसुचकतेमुळे अनेकांचे जीव वाचले. ज्या ठिकाणी पूल कोसळून दुर्घटना घडली, त्या पुलाच्या अलिकडे बसंत कुमारचं गॅरेज आहे. त्यामुळे पूल कोसळला त्यावेळी मोठा आवाज ऐकल्यानंतर बसंत कुमारने घटनास्थळाकडे धाव घेतली काळ्यामिट्ट अंधारात धावून आला. गॅरेजमधूनच त्यानं दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्याचं पाहिलं. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तो रस्त्यावर आला.
देवदूत... काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
उरलेल्या वाहनांना त्यानं पुढं जाऊच दिलं नाही. एकदा विचार करा, जर बसंतकुमार रस्त्यावर उभा राहिला नसता तर? अजून किती जणांना जलसमाधी मिळाली असती. बसंत कुमारनंच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पण काळ्यामिट्ट अंधारात आणि तुफान कोसळत्या पावसात जिथं फूटभर अंतरावरचा माणूस दिसत नव्हता, पण तरीही त्या काळरात्री बसंत शेकडो जणांसाठी देवदूतासारखा धावून आला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement