एक्स्प्लोर
बदलापुरातील रेल आंदोलकांविरोधात रेल्वे पोलिसात गुन्हा

मुंबई : बदलापुरात लोकल रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बदलापूर रेल्वे पोलिसांकडून 500 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. रुळांवर उतरलेल्या या प्रवाशांमध्ये महिला आंदोलकांचाही समावेश आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुन्हा नोंदवण्याचं काम हाती घेण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. बदलापुरात सकाळी प्रवाशांनी केलेल्या संतप्त आंदोलनामुळे रेल्वेची देशभर बेअब्रू झाली. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक अमिताभ ओझा यांची बदली करण्यात आली आहे. ओझा यांच्या जागी रवींद्र गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे बदलापूर स्थानकावर लोकल उशिरा आल्यानं प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला आणि नागरिकांनी तब्बल 6 तास रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन केलं. त्यामुळे कर्जतकडे आणि सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या एका पाठोपाठ उभ्या राहिल्या होत्या. रेल्वेनं लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी तब्बल 6 तासांनी आंदोलन मागे घेतलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























