एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bandra Migrants Crisis | महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल करावा : संजय राऊत

एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मुंबई : वांद्र्यातील गर्दी प्रकरणात सर्वात मोठा गुन्हेगार कोण असेल तर रेल्वे मंत्रालय आहे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर

संजय राऊत म्हणाले की, "राहुल कुलकर्णींना जामीन मिळाला याचा आनंद आहे. पत्रकारांवर अटकेची वेळ येऊ नये. देश किंवा राज्य चालवण्यासाठी सरकार आणि मीडिया ही दोन चाकं आहे त्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. पत्रकार चुकत असतील तर ज्येष्ठ राजकारण्यांना कान धरण्याचा अधिकार आहे. जेव्हा सरकार चुकत असेल तेव्हा पत्रकारांनी आपलं कर्तव्य बजावायला हवं असं मानणाऱ्यातला मी आहे. पत्रकाराला अटक करणं ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रात यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी सतर्क राहायला हवं. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय त्यामुळे राजकारण झालं की नाही यावर मी भाष्य करणार नाही. मी आज सामनाच्या अग्रलेखात स्पष्टपणे म्हटलं आहे वांद्र्यात जी गर्दी उसळली आणि जी कारवाई झाली तर त्यात सर्वात मोठं अपराधी कोण असेल तर रेल्वे मंत्रालय, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यानंतर वांद्र्यातल्या घटनेचा फायदा घेऊन काही पत्रकार, राजकीय पक्षाचे नेते, ज्यांनी धार्मिक चिथावणीखोर पोस्ट टाकल्या, त्यांच्यावरही कारवाई व्हावी असं माझं मत आहे."
एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी (14 एप्रिल) गर्दी जमा झाली असा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली होती. वांद्रे सत्र न्यायालयाने आज राहुल कुलकर्णी यांचा जामीन मंजूर केला आहे. राहुल कलकर्णी यांच्या वार्तांकनामध्ये कोणत्याही स्टेशन अथवा वेळेचा उल्लेख नसल्याची गोष्टी कोर्टाने ग्राह्य धरली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काल बुधवारी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी एबीपी माझाची भूमिका मांडली आहे.
ISupportRahulKulkarni | पत्रकाराला अटक करणं दुर्दैवी, राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याचा आनंद : संजय राऊत

#ISupportRahulKulkarni | कोर्टाने पोलिस कस्टडी नाकारली, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget