एक्स्प्लोर
वाशी रेल्वे स्थानकाहून अपहरण करण्यात आलेला मुलगा सापडला!
वाशी रेल्वे स्थानकावरुन 6 तारखेला 3 वर्षीय रघू शिंदेचं अपहरण करण्यात आलं होतं. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती.
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला 3 वर्षांचा मुलगा कळवा इथे सापडला आहे. अपहरणकर्त्याने 6 तारखेला मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिलं होतं. त्यानंतर तो एका महिलेला सापडला. मीडियात फोटो आल्यानंतर या महिलेने मुलाला वाशी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
रघू शिंदे असं अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षीय मुलाचं नाव आहे. 6 तारखेला वाशी रेल्वे स्थानकावरुन त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीचा शोध सुरु होता. वाशी पोलिसांनी रघूला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
स्टेशन परिसरात राहणारी महिला तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत वडापाव खरेदी करण्यासाठी आली होती. पैसे देताना आईने मुलाचा हात सोडला आणि तो हरवला. आईच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, तेव्हा एक अज्ञात व्यक्ती या मुलाला घेऊन जाताना दिसला.
हा व्यक्ती या मुलाला घेऊन 1 वाजून 3 मिनिटांनी पनवेल लोकलमध्ये चढला. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement