एक्स्प्लोर

आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं! 'ते' बोट पुण्याच्या कामगाराचेच,डीएनए चाचणीतून स्पष्ट

आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचारी पोटे यांचे असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड झाले आहे.

मुंबई :  आईस्क्रीममध्ये (Ice Cream)   सापडलेले बोट पुण्याच्या इंदापूर (Pune Indapur)  तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचं आता स्पष्ट झालंय. डीएनए चाचणीतून हे  स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  

समोर आलेल्या माहितीनुसार,  ओमकार पोटे असे या  कर्मचाऱ्याचे नाव असून 11 मे रोजी क्रशिंग मशीनवर काम करताना त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांचे बोट कापले गेले आणि कापलेले बोट आईस्क्रीममध्ये पडले होते. अपघताबाबत माहिती मिळाल्यानंतर  फॉर्च्यून डेअरीने तयार झालेले सर्वच आईस्क्रीमची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र तसे घडले नाही. हे आईस्क्रीम महिनाभराने 12 जून रोजी मालाड येथीस एका डॉक्टरच्या हाती लागले होते.

आईस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन मागवला होता. त्या आईस्क्रीम कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठून पोलीस तक्रार दिली.  पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पुण्यातील फॉर्च्युन डेयरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. याच कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. दरम्यान, पोलिसांनी या बोटाचे आणि कर्मचारी  पोटे यांच्या डीएनएचे नमुने घेऊन ते  फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते.हे नमुने  कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले  होतेय यम्मो आईस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोट कर्मचाऱ्याचे असल्याचे  'डीएनए' चाचणीत उघड 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.  फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आईस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळले आहे.  इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडले होते.  त्यानंतर डॉक्टरांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली," असे अधिकाऱ्याने सांगितले. माहिती दिली. आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचारी पोटे यांचे असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड झाले आहे.

हे ही वाचा :

आईस्क्रीममध्ये गोम सापडली! अमूल कंपनीने घेतली दखल; तपासणीसाठी महिलेकडून Ice Creamचा डबा परत मागवला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget