एक्स्प्लोर
संसार वाचवण्यासाठी मुंबई हायकोर्टात आता मानसोपचारतज्ज्ञ !

मुंबई : मुंबई हायकोर्टात आता लवकरच मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध होणार आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हायकोर्टात गुरूवारी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत. ज्यात बोलताना हायकोर्टातील जेष्ठ न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी यांनी ही घोषणा केली. सध्या हायकोर्टात कौंटुंबिक वादाची प्रकरणं दिवसागणीक वाढू लागली आहेत. ज्यात घटस्फोटाची प्रकरण सर्वाधिक आहेत. बऱ्याचदा वादाचं कारण अगदीच क्षुल्लक असतं. मात्र तरूण जोडपी अगदी टोकाचा निर्णय झटक्यात घेऊन मोकळी होतात. फॅमिली कोर्टात दिररोज 30 ते 35 प्रकरणं दिवसाला दाखल होतात आणि मनासारखा निकाल न लागल्यानं दोघांपैकी एक लगेच हायकोर्टात अपील करतो. मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीनं अश्या प्रकराच्या प्रकरणांत मदत होऊ शकते. समुपदेशाने मोडकळीस आलेले संसार वाचवण्याचा हायकोर्टाचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















