एक्स्प्लोर

Wadhwan Port : प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर मोर्चा, बंदराला स्थानिकांचा विरोध

Wadhwan Port : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. यासाठी स्थानिकांनी आज प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर मोर्चा काढला आहे.

Vadhavan Bandar Protest : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झालेत. सुमारे 25 हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. 

वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा आज केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र आलेत. पहाटेच रेल्वेतून डहाणू पालघर भागातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते. 

प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र जमले आहे. मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ : Palghar : प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात संघर्ष समितीचे मुंबईत आंदोलन, मंत्रालयावर मोर्चा

प्रस्तावित वाढवण बंदराचे फायदे-तोटे

  • समुद्रात सुमारे साडेपाच हजार एकरावर भराव केला जाणार आहे.
  • समुद्रात भराव करण्यासाठी डहाणू पट्ट्यातील डोंगर टेकड्या तोडल्या जाणार.
  • सुमारे साडेबारा किलोमीटर पर्यंत प्रवाह अडवणारी ब्रेक वॉटर बांधली जाणार आहे.
  • या प्रकल्पामुळे 47 गावे आणि 261 पाडे प्रकल्प बाधित होणार आहेत.
  • तारापूर अणुशक्ती केंद्रापासून अवघ्या सहा किलोमीटर मध्ये हा प्रकल्प उभा राहत आहे.
  • समुद्रात भराव केल्यामुळे तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये पाणी शिरू शकते.
  • प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल यांची आयात करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
  • सदर प्रकल्पामुळे मच्छिमार डाय मेकर आदिवासी शेतकरी या समाजांच्या उपजीविकेवर कुऱ्हाड पडणार आहे.
  • पालघर जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेने भरभरून दिलेलं ठिकाण उध्वस्त होणार आहे.
  • प्रवाळ खडकांची रांग, मृदुकाय प्रवाळ, तारा मासे, स्पोंज, समुद्री पानघोडे आणि पालघर जिल्ह्यातील गोड पाण्यातील माशाचे एकमेव नैसर्गिक प्रजनन केंद्र नष्ट होणार आहे.
  • प्रकल्प झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल इत्यादींची वाहतूक डहाणू मधून होणार आहे.
  • पालघर बोईसरमधील एमआयडीसीचा विस्तार वाढवला जाईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nobel Prize : अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
Sayali Patil : नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Marathwada Flood Relief | Lalbaugcha Raja कडून 50 लाख रुपयांची मदत
Flood Relief: सयाजी शिंदे यांच्या 'Sakharam Binder' नाटकाचे 12 लाख दान
Mumbai Construction Accident | जोगेश्वरी पूर्व: बांधकाम साईटवर मुलांचा अपघात, एकाचा मृत्यू
Child Marriage and Trafficking | पालघरमध्ये अल्पवयीन मुलीला ५० हजारांना विकून जबरदस्तीने लग्न
Mumbai Metro 3 | PM Modi उद्या करणार अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण, मुंबईकरांना मिळणार वेगवान प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nobel Prize : अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल, क्वांटम एनर्जी आणि टनलिंगवरील क्रांतिकारी शोधासाठी सन्मान
Sayali Patil : नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
नृत्यांगणा सायली पाटीलची संवेदनशीलता, निराधार आजीचे पडके घर दुरुस्त, नवा संसारही उभा केला
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार
Video: 2 सप्टेंबरच्या GR ला स्थगिती नाही, हायकोर्टाच्या निर्णयावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; जरांग्या म्हणत पुन्हा डिवचलं
Video: 2 सप्टेंबरच्या GR ला स्थगिती नाही, हायकोर्टाच्या निर्णयावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; जरांग्या म्हणत पुन्हा डिवचलं
मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल
मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
Embed widget