एक्स्प्लोर
भिवंडीत DCP कार्यालयासामोरच देह व्यापार करणाऱ्यांचा धिंगाणा
काही दिवसांपूर्वी या महिलांचा आपसातच भांडण होऊन एका महिलेने दुसऱ्या महिलेवर चाकूने चेहऱ्यावर वार केल्याची घटना घडली होती.
भिवंडी (मुंबई) : भिवंडी शहरातील डीसीपी कार्यालयासमोरच देह व्यापार करणाऱ्या महिलांचा राडा आता नागरिकांना दररोजची डोकेदुखी ठरत आहे. शहरातील राजीवगांधी उड्डाणपुलाखाली या महिलांचं वास्तव्य असून डीसीपी कार्यालयाच्या समोर रात्रीच्या सुमारास अश्लील चाळे करीत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करुन बिनधास्तपणे देह व्यापार करीत आहेत. मात्र तरीही पोलिसांना कारवाईत अपयश का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली असलेल्या डीसीपी कार्यालयासमोर गेल्या कित्येक दिवसांपासून बिनधास्तपणे देह व्यापार करणाऱ्या महिला अश्लील हावभाव करीत उभ्या असतात. कधीकधी या महिलांचं ग्राहकांवरुन आपसातच भांडण होतं, तर कधी ग्राहकाच्या सोबतच धिंगाणा पाहायला मिळतो. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून नेहमीच यांच्या धिंगाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या महिला नेहमी, चरस, व्हाईट्नर, कोरेक्स, नशेच्या गोळ्या घेऊन नशेत असतात. काही दिवसांपूर्वी या महिलांचा आपसातच भांडण होऊन एका महिलेने दुसऱ्या महिलेवर चाकूने चेहऱ्यावर वार केल्याची घटना घडली होती. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांशी देखील या महिलेने धिंगाणा घातला होता.
कालच एका ग्राहकासोबत मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा सर्व प्रकार डीसीपी कार्यालयासमोरच काही अंतरावर घडत असून पोलीस अशा देह व्यापार करणाऱ्या महिलांवर का कारवाई करत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement