एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टीच नाही तर महापालिकेचा मालमत्ताकरही थकित
मुंख्यत्र्यांचे मलबार हिल येथील निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचे 7 लाख 44 हजार रुपयांचे पाणी बिल थकित असल्याचे प्रकरण सध्या ताजे आहे. अशातच आता या बंगल्याचा मालमत्ता करही थकित असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंख्यत्र्यांचे मलबार हिल येथील निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचे 7 लाख 44 हजार रुपयांचे पाणी बिल थकित असल्याचे प्रकरण सध्या ताजे आहे. अशातच आता या बंगल्याचा मालमत्ता करही थकित असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2014 पासून आतापर्यंतची 7.03 लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि त्यापाठोपाठ भाजपनेही 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मालमत्ता करमाफीची घोषणा केली. परंतु मालमत्ता कराच्या देयकामधील केवळ सर्वसाधारण कर माफ झाला आहे.
मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या अनेकांना पालिकेने नोटीस बजावली असून कर वसुलीची प्रक्रिया सुरु केली आहे. तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा मालमत्ता कर थकीत आहे. 'वर्षा' निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार वर्षांकाठी मालमत्ता करापोटी राज्य सरकारकडून पालिकेकडे 1 लाख 63 हजार 144 रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे.
महापालिका दर सहा महिन्यांनी मालमत्ता कराची देयके जारी करत असते. पालिकेने ऑक्टोबर 2014 पासून ऑक्टोबर 2018 या काळात मालमत्ता कराची नऊ देयके जारी केली. परंतु भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून आजतागायत 'वर्षा' निवासस्थानाचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील पाणीबिल का थकलं? | ABP Majha
वर्षा बंगल्याचा 2014 या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांचा मालमत्ता कर भरण्यात आला आहे. मात्र त्यानंतरचा कर अद्याप भरण्यात आलेला नाही. 2014 पासून 2018 पर्यंतच्या काळातील मालमत्ता करापोटी 7 लाख 3 हजार 146 रुपये थकले आहेत. त्याशिवाय चालू आर्थिक वर्षातील कर भरणा झालेला नाही.
वर्षा बंगल्याची मालमत्ता कराची थकबाकी
ऑक्टोबर 2014 ते मार्च 2015 - 50 हजार 570
एप्रिल 2015 ते सप्टेंबर 2015 - 81 हजार 572
ऑक्टोबर 2015 ते मार्च 2016 - 81 हजार 572
एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2016 - 81 हजार 572
ऑक्टोबर 2016 ते मार्च 2017 - 81 हजार 572
एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2017 - 81 हजार 572
ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 - 81 हजार 572
एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2018 - 81 हजार 572
ऑक्टोबर 2018 ते मार्च 2019 - 81 हजार 572
एकूण - 7 लाख 3 हजार 146
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement