एक्स्प्लोर
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न
चारित्र्याच्या संशयावरुन एका प्राध्यापकाने आपल्या पत्नीची हत्या करुन, स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कल्याण पूर्व भागातील लोकग्राम भागात हा धक्कादायक प्रकार घडला.

प्रातिनिधिक फोटो
कल्याण : चारित्र्याच्या संशयावरुन एका प्राध्यापकाने आपल्या पत्नीची हत्या करुन, स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कल्याण पूर्व भागातील लोकग्राम भागात हा धक्कादायक प्रकार घडला. कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागात सरयू इमारतीत संजय तेली आणि त्यांची पत्नी विद्या तेली हे वास्तव्यास होते. संजय हे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असत. शनिवारी सकाळी त्यांचा याच कारणावरून वाद झाला, आणि रागाच्या भरात त्यांनी आपली पत्नी विद्याची चाकूने वार करुन हत्या केली. यानंतर संजय यांनीही स्वत: च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय यांनी जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा























