(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णांची लूट करतायेत; किरीट सोमैया यांचा आरोप
राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्ण आणि नातेवाईकांची लूट करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. राज्य सरकारने काढलेला शासन आदेश रुग्णांची थट्टा करणारा असल्याचे त्यांनी म्हटलंय.
मुंबई : राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णांची लूट करीत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व अनेक शहरात खाजगी हॉस्पिटलद्वारा कोरोना रुग्णांची लूट चालवली जात असल्याचं सोमैया यांनी म्हटलं आहे. या संदर्भात गेले दोन महिने अनेक तक्रारी येत आहेत. परंतु, राज्य सरकारने याची दखल घेतली नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
कोरोना रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने भरमसाठ बिलं वसूल करण्यात येतात याची दखल घेऊन राज्य सरकारने आदेश, जीआर काढण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, महापालिका आयुक्त, महापौर या सर्वानी खाजगी हॉस्पिटलना इशाराही दिला. मात्र, प्रत्यक्षात कोरोना रुग्णांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने जो आदेश, जीआर काढला तो कोरोना रुग्णांची थट्टा करणारा आहे, असं आज पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमैया यांनी म्हटले.
राज्य सरकारचा आदेश खाजगी रुग्णालयांच्या फायद्यासाठीच : सोमय्या राज्य सरकारचा आदेश खाजगी रुग्णालयांच्या फायद्यासाठीच असल्याचं किरीट सोमैया यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, की शासनाने आपल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांचे शोषण करीत आहेत. म्हणून कोविड रुग्णाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने जीआर/परिपत्रक जारी केले. त्या जीआरमध्ये असे दिसून येते की सरकारने फक्त बेडचे शुल्क निश्चित केले आहे. आता हॉस्पिटल पीपीई किट्स चार्जेस, कोविड मॅनेजमेंट चार्जेस, डॉक्टर सुपरव्हिजन चार्जेस, नर्सिंग चार्जेस, 10% सरचार्ज, हॅण्ड गलोव्हज चार्जेस, आयसीयू मॅनेंजमेंट, बायो मेडीकल वेस्ट मॅनेजमेंट, मॉनिटरिंग चार्जेस यांच्या नावाखाली दर आकारत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो रुग्णांची तक्रार टी.व्ही . चॅनेल्स व वर्तमान पत्रात छापून आली. त्यापैकी फक्त एकमात्र एफआरआर नानावटी हॉस्पिटलच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. तेही त्या रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबांनी नानावटी हॉस्पिटल लूटच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल केला म्हणून.
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांचे आदेश
कोविड रग्णांची लूट तत्काळ थांबवावी : सोमैया राज्य सरकार, मुंबई महापालिका व खाजगी हॉस्पिटलनी चालवलेली ही लूट लाबडतोब थांबवावी अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने जी आतापर्यंत फक्त बेड चार्जेसचे दर ठरवले आहेत. तसेच बाकी इत्तर सर्व चार्जेसचे किमान दर जीआरद्वारा द्यावी अशी मागणी करत आणि जर लूट थांबली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असं सोमय्या यांनी सांगितले आहे.
तसेच राज्य सरकारने 10 हजार इंजेक्शन आम्ही उपलब्ध करू असे सांगितले. पण इंजेक्शनसाठी आणि औषधांसाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. केईएम रुग्णालयात कोविड रुग्ण गायब, रुग्णांबरोबर मृतदेह गायब, नर्सेस आणि वार्डबॉयची कमतरता आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येची चौकशी होते. मग सामान्य रुग्णांची आत्महत्या या प्रकारावर कर्मचारी व अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई व्हायला, हवी अशी मागणी देखील आज पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी केली आहे.
Lockdown | पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन; पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा