'मेट्रो-3' च्या स्थानकांनाही मिळणार खाजगी कंपन्यांची नावे; बीकेसी स्थानकास सर्वाधिक पसंती
मुंबईमध्ये विविध संस्था आणि व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी एक मेकांची कशी साथ देतात तेच या प्रचंड प्रतिसादमधून स्पष्ट होत आहे. मेट्रोचे नेटवर्क आणि प्रवासी संख्या एखाद्या ब्रँडला किती प्रसिद्धी मिळवून देऊ शकतात हेच विविध ब्रँड्सनी दाखवून दिले आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गावरील स्थानकांच्या नावाचे अधिकार हक्क मिळवण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. एकूण 28 नामांकित ब्रँड्स मेट्रो 3 स्थानकांच्या नावाचे अधिकार हक्क घेण्यास उत्सुक असून काही कंपन्यांनी एकाहून अधिक स्थानकांच्या नाम अधिकारासाठी स्वारस्य दाखवले आहे.
विविध कंपन्याद्वारे 18 स्थानकांसाठी एकूण 87 स्वारस्य अर्ज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी शहरातील अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र समजल्या जाणाऱ्या बीकेसी स्थानकासाठी सर्वाधिक 12 स्वारस्य अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दादर व आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकांसाठी प्रत्येकी 9 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि ही दोन्ही स्थानके दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या नंतर स्थानिक विमानतळ व सीएसएमटी स्थानकाकरीता प्रत्येकी 7 स्वारस्य अर्ज प्राप्त झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : मुंबई मेट्रोच्या दोन कंत्राटदारांना नारळ, एमएमआरडीएची कारवाई
मेट्रो 3 स्थानकांचे नाम अधिकार हक्क मिळवण्यासाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांमध्ये एल.आय.सी, इंडियन ऑईलसारख्या सार्वजनिक उपक्रम संस्था आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यू.टी.आय, कोटक, आय.डी.एफ.सी. फर्स्ट, एच.एस.बी.सी. सारख्या बँका आणि आर्थिक संस्था आहेत. इंडिगो, स्पाईसजेतसारख्या विमान कंपन्या आहेत. तसेच जे. एस.डब्लू., ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन, टाइम्स समूह, ब्लॅकस्टोन, फिनिक्स मिल्ससारख्या कार्पोरेट कंपन्या आहेत. पिरामल, ओबेरॉय, डी.बी. रिअल्टी सारख्या कंपन्यांप्रमाणेच इतरही अनेक नामवंत कंपन्या आहेत. या सर्व स्वारस्य अर्जाची प्रक्रिया एमएमआरसीच्या नॉन फेअर रेव्हेन्यू सल्लागार ऑक्टस अॅडव्हायझर स्टुडिओ - पी. ओ. डी व्दारे राबविण्यात आली आहे.
मुंबईमध्ये विविध संस्था आणि व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी एक मेकांची कशी साथ देतात तेच या प्रचंड प्रतिसादमधून स्पष्ट होत आहे. मेट्रोचे नेटवर्क आणि प्रवासी संख्या एखाद्या ब्रँडला किती प्रसिद्धी मिळवून देऊ शकतात हेच विविध ब्रँड्सनी दाखवून दिले आहे.
पाहा व्हिडीओ : मेट्रो 3 च्या भूयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण
एमएमआरसी चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजीत सिंह देओल सांगितले , "तिकीट- भाडे व्यतिरिक्त मिळणारे महसूल कुठल्याही वाहतूक व्यवस्थेच्या शाश्वत कार्यान्वयनासाठी अतिशय महत्त्वाचे असते. यामुळे तिकिटाचे दर नियंत्रणात ठेवणे शक्य होते. स्थानकांच्या नाम अधिकाराद्वारे मिळणारा महसूल महत्त्वाचा स्रोत असेल. विविध नामांकित कंपन्यांद्वारे यास मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे". याद्वारे ब्रॅण्डसना देखील फायदा होणार असून मेट्रो 3 सारख्या महत्त्वपूर्ण मेट्रो मार्गिकेसोबत त्यांचे नाव जोडले जाणार आहे, असे देओल म्हणाले.
संबंधित बातम्या :
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट, बँकेबरोबर 1600 कोटीचा सामंजस्य करार
मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर, आरेमध्येच काम सुरु ठेवण्याची शिफारस