एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे जेलमध्ये कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली : रमेश कदम
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेल प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर कैद्याची प्रकृती बिघडली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
रमेश कदम यांच्या आरोपांनुसार, "ठाणे जेलमध्ये 27 जून रोजी ही घटना घडली. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला मारहाण केलीच शिवाय त्याला मानवी विष्ठा खायला लावली." रमेश कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला आयोगाकडे तक्रार नोंदवली असून आयोगाने जेल प्रशासनाला समन्स पाठवला आहे. तसंच आरोपांना आधार म्हणून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जेलर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली होती.
संबंधित बातम्या
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार, 3700 पानी पुरावे दिल्याचा लक्ष्मण ढोबळेंचा दावा
महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री
अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची कहाणी...
सीआयडी छळतं, मात्र तरीही कोठडी वाढवा, आमदार रमेश कदम यांची नौटंकी
आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम फरार, पोलिसांची नाकाबंदी, कार्यकर्त्यांची आतषबाजी
पोलिस स्टेशनवर दगडफेक: राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांची कोल्हापूर कारागृहात रवानगी
सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या आ. रमेश कदमांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनवर दगडफेक
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही अडकू शकतात : दिलीप कांबळे
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक
महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामडंळाचे 80 कोटी गायब, 14 जण निलंबित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement