एक्स्प्लोर
छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलबाहेर
जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम तासाभरासाठी जेलमधून सुटणार आहेत.
मुंबई/नवी दिल्ली: देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केलं.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे.
छगन भुजबळ, रमेश कदम तासाभरासाठी जेलबाहेर
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदानासाठी जेलबाहेर आले आहेत.
या दोघांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
पैशांच्या अफरातफरीप्रकरणी छगन भुजबळ सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तर रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणात भायखळा जेलमध्ये आहेत.
या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.
दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी नेण्यात आलं. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलकडे नेण्यात येईल.
20 जुलैला निकाल
एनडीएकडे शिवसेनेची मिळून 5 लाख 37 हजार 683 मतं आहेत, मात्र बहुमतासाठी आणखी 12 हजार मतांची त्यांना गरज भासणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. आज मतदान पार पडल्यानंतर 20 जुलैला मतमोजणी होईल, तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला राष्ट्रपतीपदी विराजमान होतील.
संबंधित बातम्या
छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार!
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा : छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement