एक्स्प्लोर

पॉर्नोग्राफी प्रकरणा; राज कुंद्राकडून मुंबई सत्र न्यायालयातील जामीनासाठीची याचिका मागे

आपल्याला हॉटशॉट आणि बॉलीफेम बद्दल काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते हे आपल्याला माहित नसल्याचं शिल्पा शेट्टी कुंद्रा हिने आपल्या जबाबात नमूद केले आहे.

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रानं मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन गुरूवारी अर्ज मागे घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून न्यायालयात याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याचाच आधार घेत कुंद्रा आता मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात नव्यानं जामीनासाठी याचिका दाखल करणार आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर जुलै महिन्यापासून तुरूंगात असलेल्या राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी सुमारे दीड हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. यात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि एक अन्य आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी गंभीर आरोप लावले आहेत.

या पुरवणी आरोपपत्रात कुंद्राच्या मोबाईलमधील इतर आरोपींसोबतचे संदेश लॅपटॉपमध्ये सापडलेल्या 60 हून अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात ठेवले आहेत. तसेच राज कुंद्रा फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 पर्यंत आर्म्स प्राईममध्ये संचालक होते. तेव्हा, हॉटशॉटमधून उत्पन्न झालेला महसूल आणि पैसे केनरिन कंपनीच्या लॉयन्स बँक ऑफ जमा केले होते. प्रदीप बक्षी हे लंडनमधील केनरिन कंपनीचे संचालक होते. आरोपी, साक्षीदारांचे जबाब आणि ईमेल आणि संगणकावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत गूगलकडून 20 लाख 24 हजार 776 रुपये मिळाले, दुसरीकडे, अॅपलकडून ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत 1 कोटी 16 लाख 58 हजार 925 रुपये मिळाले असल्याचं आरोपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.

आरोपपत्रात शिल्पा शेट्टीचाही जबाब? 

या आरोपपत्रात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही साक्षीदार बनवण्यात आलेलं आहे. शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रांनी 2015 मध्ये वियान इंडस्ट्री कंपनी सुरू केली, त्यांच्याकडे या कंपनीमध्ये 24.50 टक्के शेअर्स होते. या कंपनीमध्ये ती एप्रिल 2015 ते जुलै 2020 पर्यंत संचालक पदावर होती, त्यानंतर तिने वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडले. तसेच आपल्याला हॉटशॉट आणि बॉलीफेम बद्दल काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते हे आपल्याला माहित नसल्याचं शिल्पानं नमूद केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Embed widget