एक्स्प्लोर

पेंग्विनला काँग्रेसची श्रद्धांजली, मनसेची लिंबू-मिरची फंडाची मागणी

मुंबई : दीड वर्षाच्या पेंग्विनने राणीच्या बागेत प्राण सोडला आणि आता त्याच्या मरणाची चिकीत्सा सुरु झाली आहे. दक्षिण कोरियावरुन आयात केलेल्या पेंग्विनच्या मृत्यूची हळहळ व्यक्त करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा सुरु झाली आहे. स्थायी समितीतही आज ही चढाओढ पाहायला मिळाली. मैं पेंग्विन को श्रद्धांजली देती हुँ... उसके लिये शोकप्रस्ताव की मांग रखती हूँ - वकारुन्नीसा अन्सारी, काँग्रेस पेंग्विन को स्ट्रेस था...अत्यंतिक तनाव से वो मर गया हैं - रईस शेख, समाजवादी पक्ष पेंग्विनला पनवती लागु नये म्हणून लिंबु मिरची फंड आणा - संतोष धुरी, मनसे दूरदेशाहून मुंबईत आलेल्या या दीड वर्षाच्या पाहुण्यानं मुंबईतच जीव सोडला. तिकडे बर्फात, पाण्यात मनसोक्त खेळणारा पेंग्विन काही महिने इथल्या काही फुटांच्या चौकटीत पोहला...थकला...आणि जीवानिशी गेला. त्याच पेंग्विनच्या जीवावर आता राजकारण सुरु आहे. आपल्याकडे दरवर्षी कुपोषणानं मुलं दगावतात... शेकडो मुंबईकरांनी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधल्या जागेत मृत्यू येतो. पण या सर्वांपेक्षा या पेंग्विनचा मृत्यू महत्वाचा आहे. कारण त्याच्या मृत्यूची वेळ राजकिय पक्षांसाठी मुंबईतच्या नव्या राजकारणाचा मुहूर्त ठरली आहे. कुणी कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या या पेंग्विनसाठी शोकसभा भरवा अशी मागणी केली, तर कुणी पेंग्विनच्या ताणतणावाचं मोजमाप करा अशी मागणी केली. रोज बीपी, हार्ट अटॅकचे नवे पेशंट तयार करणाऱ्या, माणसाला कणाकणानं मारणाऱ्या या शहरानं पेंग्विनवरही आपली जादू केली तर.. पेंग्विन मेला, नवे रस्ते खड्डे पडून मेले, मोकळी मैदानं, उद्यानं त्यावरचा कचरा कुजून मेले...या सगळ्यालाच एकाएकी पनवती लागली असं म्हटलं जात आहे. या पनवती लागण्यावरही स्थायी समितीत आता जालीम उपाय सुचवला जात आहे. पण, पेंग्विनची बाकीची भावंडं अजून जिवंत आहेत. त्यांच्या जीवाला मात्र डोळ्यांत तेल घालून जपलं जातंय. त्यांच्यासाठी स्पेशल किचन, स्पेशल स्विमींग टँक काय काय म्हणून विचारु नका...शेवटी लाखोंच्या संख्येनं असलेल्या मुंबईकरांपेक्षा हे पेंग्विनचे जीव लाखमोलाचे नाहीत का??? बाकी कोण काय नशिब घेऊन जन्माला येईल सांगता येत नाही... या आलिशान जागेत पोहणाऱ्या, सगळं काही रेडीमेड असणाऱ्या पेंग्विनचा लोकलमध्ये धक्काबुक्की करतांना हेवा वाटेल. कदाचित...पण, कुणास ठाऊक त्या मुक्या जिवाच्या मनात काय आहे...शेवटी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

संबंधित बातम्या :

पेंग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी

एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन

राणीच्या बागेतील एका मादी पेंग्विनचा जिवाणू संसर्गामुळे मृत्यू

बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा

पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका : उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget