एक्स्प्लोर
रेल्वे अपघातातील जखमीला मदत करणाऱ्यालाच पोलिसांनी झापलं!
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केल्यानंतर पोलिसांनी मदत करणाऱ्या व्यक्तीला झापल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केल्यानंतर पोलिसांनी मदत करणाऱ्या व्यक्तीला झापल्याचं समोर आलं आहे.
रविवारी चर्नी रोड रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे अपघातात एक व्यक्ती जखमी झाला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या श्रवण तिवारीनं तत्परता दाखवली आणि जखमी व्यक्तीला सैफी रुग्णालयात दाखल केलं आणि आपलं कर्तव्य बजावलं.
मात्र, मुंबई पोलिसांनी मदत करणाऱ्या श्रवणलाच झापलं. कुणाच्या परवानगीनं जखमीला मदत केली? असा सवाल पोलिसांनी विचारला आणि हा सगळा प्रकार कॅमऱ्यात कैद झाला आहे.
खरं तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जखमी व्यक्तीला तातडीची मदत करणं आवश्यक आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीला चौकशीच्या फेऱ्यात अडकवू नये असंही कोर्टानं बजावलं आहे. तरीही मुंबई पोलिसांकडून मात्र मदत करणाऱ्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करणार असल्याचं समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
