एक्स्प्लोर
सरकारकडून हेरगिरी सुरु, मनसेचा गंभीर आरोप
सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. मुंबईत मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस वावरत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
मुंबई : सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. मुंबईत मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस वावरत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्यानं त्यांनी चौकशी केली असता ते पोलिसच असल्याचं समोर आल्याचं मनसेचं म्हणणं आहे. रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ही पत्रकार परिषद सुरु होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही असाच आरोप केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्याचं समोर आलं होतं. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला होता.
काँग्रेसपाठोपाठ आता मनसेनेही सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा आरोप केल्याने आता सरकार याविषयी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement