एक्स्प्लोर
VIDEO : नवी मुंबईत तरुणाची पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली, मात्र काही अवधीतच त्याची सुटका झाली.

नवी मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत घडली. कोपरखैरणे येथील कांचन जंगा बिल्डिंग जवळ ही घटना घडली. तानाजी रामचंद्र पाटील असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे. तानाजी पाटील हे रात्रीच्या ड्युटीवर होते. त्यावेळी दानिश इब्राहिम शेख या तरुणाने तानाजी पाटील यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्या कानशिलात लगावली. यावेळी दानिशसोबत एक तरुणीही दिसत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वच स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली, मात्र काही अवधीतच त्याची सुटका झाली. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























