एक्स्प्लोर
'मोदींना सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात हव्यात', संजय राऊतांचा गौप्यस्फोट
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन.’’
मुंबई : ‘पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात हव्या आहेत.’ असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांच्याशी झालेल्या गप्पांदरम्यान पवारांनीच याबाबतची माहिती आपल्याला दिली, असा दावा संजय राऊत त्यांनी दैनिक सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे.
मात्र, राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या निव्वळ अफवा आहेत, असं देखील पवारांनी आवर्जून म्हटल्याचं राऊत यांनी नमूद केलं आहे.
संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली. देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद पवारांना स्थान असल्याच्या बातम्या जोरात होत्या, हे कसे?’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? त्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.’’ ‘‘मग तुमच्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत बातम्या का येतात?’’ ‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, पण गोंधळ उडविण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात.’’संजय राऊत यांच्या या थेट दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement