एक्स्प्लोर

PM Modi Speech LIVE: कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं - पंतप्रधान मोदी

PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत.

Key Events
PM Modi Address India LIVE Updates Speech urging people ahead Deewali 2021 100 crore vaccination important highlights PM Modi Speech LIVE: कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

Background

PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले.  आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

कोरोना लसीकरणासह मोदींच्या संबोधनात काश्मीरमधील घडामोडींवर देखील भाष्य होण्याची शक्यता आहे.  काल देशातील लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यानंतर बोलताना मोदींनी म्हटलं होतं की, ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. 

China Corona Update : चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! जगातील सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ

देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल."

दरम्यान, कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा काल ओलांडला. देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता काल 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.

10:49 AM (IST)  •  22 Oct 2021

अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक

तज्ज्ञ आणि देश-विदेशातील अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. भारतातील कंपनीमध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत. त्याशिवाय रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक सुरु आहे. मेड इन इंडियाची ताकद सर्वात मोठी आहे. स्वच्छ भरात अभियानाप्रमाणेच ocal for Local चाही नारा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या अथवा भरातीयांनी तयार केलेल्या गोष्टी खरेदी करायला हव्यात. मेड इन इंडियावर भर द्यायला हवा. हे सर्व भारतीयांच्या सहभागानंतरच यशस्वी होईल. 

10:48 AM (IST)  •  22 Oct 2021

महामारीनंतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले

100 वर्षानंतर आलेल्या सर्वात मोठ्या महामारीनंतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या महामारीचा भारत कसा सामना करणार? इतर देशाकडून लस खरेदी करण्यासाठी भारताकडे पैसे येणार कुठून? भारताला लस कधी मिळणार? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं 100 कोटी लसीकरण हे आहे. सर्वांना सोबत घेऊन मोफत लसीकरणाची मोहीम सुरु केली.  गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा महामारी भेदभाव करत नाही. त्यामुळे लसीकरणातही भेदभाव नाही. त्यामुळे लसीकरणात व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही, असे मोदी म्हणाले. भारतासारख्या लोकशाही देशात कोरोनासोबत लढणं कठीण होईल, असं महामारीच्या सुरुवातीला म्हटलं जातं होतं. भारतातील लोकांकडे संयम आणि शिस्त आहे का? पण आपण या  सर्वांना लसीकरणातून उत्तर दिलं आहे. आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ आहे, असेही ते म्हणाले.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget