एक्स्प्लोर

प्लास्टिक बंदीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

मुंबई: राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्लास्टिक उत्पादक संघटनेसह अन्य दोन संबंधित संघटनांनी राज्य सरकारच्या निर्णयास विरोध करत या याचिका दाखल केल्या आहेत. हायकोर्टानं राज्य सरकारला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 11 एप्रिलला या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे. प्लास्टिक बंदी बेकायदा असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. बंदी करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्राचा आहे. पण राज्य सरकारनं सरसकट प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे सूचना आणि हरकती न मागवताच निर्णय घेतला गेल्यानं जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी महाराष्ट्र सरकारने राज्यात गुढीपाडव्यापासून (18 मार्च) प्लास्टिक तसेच थर्माकॉल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर सरकारने 23 मार्चच्या रात्रीपासून अधिसूचना जारी केली. यानुसार प्लास्टिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना येत्या एक महिन्यात प्लास्टिक नष्ट करावं लागणार आहे. मात्र, औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसंच वन फलोत्पादनासाठी, कृषी आणि घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आलं आहे. तर दूध डेअरी, वितरक आणि विक्रेत्यांनाच दुधाची पिशवी पुन्हा खरेदी कराव्या लागतील. राज्यभरात 24 मार्चपासून निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. संबंधित बातम्या राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी  राज्यभरात प्लास्टिकबंदी, पर्यावरण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा! दुधाच्या प्रत्येक पिशवीमागे 50 पैशांचा प्लास्टिक टॅक्स

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Embed widget