एक्स्प्लोर

ठाणे महापालिका आयुक्तांविरोधात याचिका, विनयभंगाचा आरोप

एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर या याचिकेमार्फत करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली.

ठाणे : ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवणारे सनदी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर या याचिकेमार्फत करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली असता हायकोर्टाने एसीपी पद्मजा चव्हाण यांना त्या 15 वर्षीय मुलीचा जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेतून जयस्वाल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. सदर मुलीकडून रात्री उशिरापर्यंत जयस्वाल बॉडी मसाज करुन घेत असत, असा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने मनपाडा पोलीस स्टेशन तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही. याउलट पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळेच जयस्वाल यांनी सूड भावनेने तक्रारदार महिला राहत असलेली झोपडपट्टी तोडली, असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन संजीव जयस्वाल यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद व्हावी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget