एक्स्प्लोर

मुंबईच्या टोल नाक्यांच्या मासिक पासधारकांसाठी फास्टॅगमध्येच पास सुविधा उद्यापासून सुरु

आता टोल नाक्यावर प्रत्यक्ष न जाता त्या ऐवजी बँकेस ऑनलाईन पद्धतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येईल. फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल.

मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या टोल नाक्यावरुन मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग मधेच मासिक पास मिळणार आहे. या योजने बाबत सह व्यवस्थापकीय संचालक  विजय वाघमारे यांनी सांगितले की, टोल नाक्यावर प्रत्यक्ष जात रोख रक्कम देऊन मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीत बदल करुन त्या ऐवजी बँकेस ऑनलाईन पद्धतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅग साठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल. तसेच यापुढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे आवश्यक आहे.
 
म.रा.र.वि.महामंडळ, आयसीआयसीआय बँक व मे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (कंत्राटदार) यांच्यामध्ये झालेला करारानुसार ही सुविधा देण्यात येणार आहे. वाहनधारकासाठी ऑनलाईन पद्धतीमध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org व दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येते व मिळणाऱ्या पावतीवरील Authorization क्रमांक संबधित टोल नाक्यावर 3 दिवसाचे आत जाऊन त्यानुसार मासिक पास कार्यान्वित करुन घ्यावा लागेल. मुदतीत कार्यन्वित न केल्यास पास आपोआप रद्द होऊन तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.

FASTag ची सक्ती म्हणजे लोकांच्या अधिकारावर गदा नाही, केंद्र सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

टोल प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक, कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेमुळे साधारणपणे 22 हजार ते 25 हजार वाहन धारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबई टोल नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेश द्वारावरील 4 टोल नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे.

टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही, वाचा नवीन नियम

राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजूच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा 26 जानेवारीचा पहिला प्रयोग यशस्वी झालाआहे. त्यानुसार वाशी, ऐरोली येथील टोल नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅग मध्ये रुपांतरीत करणेचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा कार्यन्वित होईल व त्यामुळे मुंबई नाक्यांवर वाहनधारकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget