एक्स्प्लोर

लॉकडाऊन काळात आरे कॉलनीत पार्टी, 33 जणांविरोधात गुन्हा

आरे कॉलोनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियम धुडकावून पार्टी करताना आढळले. तिथं पार्टी करणाऱ्या 33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला असून महत्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा या आवाहनासा आणि नियमांना हरताळ फासण्याचं काम केलं जातंय. आरे कॉलोनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियम धुडकावून पार्टी करताना आढळले आहेत. तिथं पार्टी करणाऱ्या 33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये संचारबंदी आणि कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून ही लोकं पार्टी करत होती. आरे कॉलोनीतील रॉयल पालमसमध्ये शनिवारी संध्याकाळी ही पार्टी सुरू होती. ही लोकं विकेंडसाठी येथे जमली होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून पार्टी सुरू असल्याची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले आणि कारवाई केली. पार्टीच्या वेळी नियमांची सपशेल पायमल्ली झाल्याचं चित्र होतं. सुरक्षित अंतर नाही, तसंच मास्क घातले गेले नव्हते. ही लोकं मुंबईच्या विविध भागातून आली होती. तर काही जण गुजरात मधून आल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे जिमखान्याचा 85 वा वर्धापण दिन होता. जो साजरा करण्यासाठी जिमखान्यातील सभासद एकवटले होते. त्यावेळी सुद्धा नियमांची अशाच प्रकारे पायमल्ली करण्यात आली होती. या संदर्भात मुंबई पोलिसांनी जिमखान्याच्या अध्यक्षांसह 15 सभासदांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत 188 अंतर्गत मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई
  • 30436 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  •  4287 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
  •  9863 लोकांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
  •  16286 आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आलं आहे.
या सर्व कारवाया लॉकडाऊनमध्ये ज्यांनी लॉकडाऊनचे नियम मोडले त्यांच्याविरोधात करण्यात आल्या आहेत. देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्र आहेत आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यात लोकांकडून लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget