एक्स्प्लोर
परळ आग : धुरातून बाहेर पडण्यासाठी चिमुरडीचं ट्रेनिंग
दहा वर्षांच्या झेनने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र दाखवलं आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली.

मुंबई : परळमधील उच्चभ्रू वसाहतीतील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चौघा जणांना प्राण गमवावे लागले. लिफ्टमधून येणाऱ्या दोघा जणांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला, तर आगीत होरपळून दोघांचा जीव गेला. एका चिमुरडीने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र दाखवलं आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली. 10 वर्षांच्या झेनने घरातील कपडे जमवून फाडले आणि ओले केले. ओले कपडे नाकाशी धरुन श्वासोच्छवास करण्याचा सल्ला तिने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना दिला. त्यामुळे आगीनंतर धुराचं साम्राज्य पसरलेलं असतानाही श्वास गुदमरत नाही. कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो, असं झेनने सांगितलं. आगीतून बाहेर पडताना आपले केस ओले करण्याचा सल्लाही तिने रहिवाशांना दिला. आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये, असं अग्निशमन दलातर्फे वारंवार बजावलं जातं. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत वृद्धेसह एकाने लिफ्टने खाली येण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्टमध्ये श्वास गुदमरुन दोघांचाही करुण अंत झाला. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. त्याच वेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीतील 25 रहिवाशांची सुखरुप सुटका केली.
परेलच्या क्रिस्टल टॉवरमधील आगीत चौघांचा मृत्यू
क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर सकाळी साडेआठ वाजता आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाच वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारतीला 'ओसी' नव्हती. तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीतील काही रहिवाशांनी केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी परिसरात धूर कायम आहे.आणखी वाचा























