एक्स्प्लोर
मोपलवारांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, मुख्यमंत्र्यांचे आदेश
माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ या त्रिसदस्यी चौकशी समितीचे अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ आणि पोलिस उपायुक्त (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) समितीचे सदस्य असतील.
मुंबई : कथित ऑडियो क्लिपमुळे दलालीचे आरोप झालेल्या राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात आदेश देत संबंधित समितीला एक महिन्यात चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ या त्रिसदस्यी चौकशी समितीचे अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ आणि पोलिस उपायुक्त (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) समितीचे सदस्य असतील. रविवारी मुख्यमंत्र्यांनी या समितीला महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मोपलवारांना पदच्युत केल्यानंतर भूषण गगराणींना अतिरिक्त कार्यभार
'एबीपी माझा'नं ही कथित ऑडिओ क्लिप दाखवली होती. त्यात एमएसआरडीसीचे प्रमुख राहिलेले राधेशाम मोपलवारांनी एका इमारतीच्या बांधकामावरुन सेटलमेंट केल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरुन अधिवेशनातही गदारोळ झाला होता. त्यानंतर काल यासंदर्भात चौकशी समिती नेमली गेली आहे.राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं. आता ते विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याची माहिती आहे. मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप होत आहे. राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत केल्यानंतर भूषण गगराणी यांच्याकडे एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संबंधित बातम्या : ‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’ एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement