एक्स्प्लोर

Palghar : ड्युटीवर असणारा सीआयएसएफ जवान रायफल आणि जीवंत काडतुसांसह फरार, पालघरमधील धक्कादायक घटना

Palghar News Update : सीआयएसएफचा एक जवान गुरुवारी दुपारी तारापूर अणुशक्ती केंद्रात कामावर असताना अचानकपणे आपल्या शस्त्रास्त्रांसह निघून गेला आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अनुशक्ती केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी हा  जवान सांभाळत होता.

पालघर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (Central Industrial Security Force) एक जवान (Soldier) रायफल आणि 30 जीवंत काडतुसे घेऊन काल दुपारपासून फरार झाला आहे. मनोज यादव असे या जवानाचे नाव आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अती महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्र (Tarapur Nuclear Power Station) आणि भाभा अनुशक्ती केंद्राच्या (Bhabha Anushakti Centre) सुरक्षेची जबाबदारी हा जवान सांभाळत होता. सीआयएसएफ तसेच राज्य पोलीस यांच्यामार्फत याबाबतची चौकशी सुरू असून या घटनेमुळे राष्ट्रीय प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मनोज यादव हा सीआयएसएफचा जवान गुरुवारी दुपारी तारापूर अणुशक्ती केंद्रात कामावर असताना अचानकपणे आपल्या शस्त्रास्त्रांसह कुठेतरी निघून गेला. त्याच्याकडे एलएमजी रायफल आणि 30 जीवंत काडतुसे असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये एकटा राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा कामावर रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने तारापूर येथील पोलीस ठाण्यात सीआयएसएफतर्फे माहिती देण्यात आली. 

दीड दिवसाच्या गणपतीच्या बंदोबस्तात पोलीस कर्मचारी असल्याने या प्रकरणात तक्रार नोंदवण्यास रात्र उजाडली. काल रात्री पोलिसांनी परिसरातील संशयाच्या सर्व ठिकाणांचा तपास केला. तसेच त्याच्या मोबाईलच्या आधारे त्याचा ठाव ठिकाणा मोबाईल ट्रेकिंगद्वारे तपास सुरू केला आहे. तसेच अणुऊर्जा केंद्रातील आणि सुरक्षा नाक्यांच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची देखील कसोशीने पाहणी करण्यात आली आहे. सध्या या जवानाचा मोबाईल फोन बंद असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत असून घरगुती किंवा जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अग्निशस्त्र घेऊन पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बरोबरीच या जवानाची मानसिक स्थिती बिघडल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असून 30 जीवंत काडतूस घेऊन फरार झाल्यामुळे चिंतेचा विषय ठरला आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्राची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे असून या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक सुरक्षाविषयक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांटमधून अनेकदा महागड्या वस्तूंची चोरी झाल्यानंतर देखील त्याबाबत यशस्वी तपास होऊ शकला नव्हता. केंद्रामध्ये यापूर्वी एका सुरक्षारक्षकाने वाहन बेदरकारपणे चालवून अपघात केल्याचा प्रकार घडला होता.
याविषयी पालघरचे अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget