एक्स्प्लोर
शेवटच्या दिवशीही भाजपची शिवसेनेला विनवणी, पालघरमध्ये नवा प्रस्ताव!
श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे.
![शेवटच्या दिवशीही भाजपची शिवसेनेला विनवणी, पालघरमध्ये नवा प्रस्ताव! Palghar bypoll 2018 : BJPs new offer to shiv sena शेवटच्या दिवशीही भाजपची शिवसेनेला विनवणी, पालघरमध्ये नवा प्रस्ताव!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/27130316/cm-and-uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पालघर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत आहे, मात्र अजूनही भाजपला शिवसेनेकडून आशा आहे. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्याचं आम्ही पुनर्वसन करु, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे.
श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शिवसेनेनं स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजने युतीचा प्रस्ताव दिला होता, त्यानंतर आता पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला गळ घालत आहे.
पालघर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आज भाजप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. 10 मे ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहेत. तर 14 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
त्यामुळे शिवसनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांचा अर्ज दाखल
दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करत, शिवसेनेकडून श्रीनिवासन वनगा यांचा अर्ज मंगळवारी 8 मे रोजी दाखल करण्यात आला. यावेळी ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.
‘एक मत शिवसेनेला, एक मत चिंतामण वनगा साहेबांना’, अशी मोहिम शिवसेनेने पालघरमध्ये सुरु केली आहे.
काँग्रेसचे राजेंद्र गावित भाजपमध्ये
दुसरीकडे, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालघरची उमेदवारी देण्यासाठी राजेंद्र गावित यांचं नाव भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवलं आहे.
त्यामुळे राजेंद्र गावित आज उमेदवारी अर्ज भरण्याची चिन्हं आहेत.
भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला.
कोण आहेत राजेंद्र गावित?
राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेस नेते राजेंद्र गावित भाजपात, पालघरची उमेदवारी मिळणार
पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)