मराठीसाठी लेखिकेचा 20 तास ठिय्या, मुजोर सराफाकडून अखेर माफी!
मराठी भाषेसाठी लेखिका शोभा देशपांडे यांनी जवळपास 20 तास रस्त्यावर ठिय्या दिला. एबीपी माझाच्या बातमीनंतर मनसेने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. यानंतर वठणीवर आलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मुजोर मालकाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
![मराठीसाठी लेखिकेचा 20 तास ठिय्या, मुजोर सराफाकडून अखेर माफी! Owner of Mahaveer Jewellers apologies writer Shobha Deshpande after MNS intervention मराठीसाठी लेखिकेचा 20 तास ठिय्या, मुजोर सराफाकडून अखेर माफी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/09162953/Jeweller-Appolgy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबईतील कुलाब्यात लेखिका शोभा देशपांडे यांनी जवळपास 20 तास ठिय्या दिला. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. अखेर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
कालपासून ठिय्या सुरु केलेल्या शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. यानंतर इथे एकच गोंधळ आला. आधीच उपस्थित असलेले मनसे सैनिक अतिशय आक्रमक झाले. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे. मला माफ करा, असं या सराफा व्यावसायिक म्हणाला. मात्र शोभा देशपांडे यांचे पाय धरुन माफी मागा, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी केला. माफी मागितल्यानंतर पोलीस महावीर ज्वेलर्सच्या मालकाला घेऊन जात असताना, मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला.
मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराकडून अपमान, लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या!
मालकाने माफी मागितली तरी शोभा देशपांडे त्याच्या दुकाराच्या परवान्यासाठी आग्रही होत्या. मालकाने परवाना दाखवावा या मागणीवर त्या ठाम आहेत. यानंतर पोलीस शोभा देशपांडे यांना वैद्यकीय तपासणी घेऊन गेले. शोभा देशपांडे यांचं वय आणि कालपासून उपाशी असल्याने पोलीस शोभा देशपांडे यांना रुग्णालयात घेऊन गेले.
काय आहे प्रकरण? शोभा रजनीकांत देशपांडे काल (8 ऑक्टोबर) दुपारी त्या कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. मात्र त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून दिलं. यामुळे दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केल्याचा आरोप करत त्या काल दुपारपासून या दुकानासमोरील रस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. जोपर्यंत त्या ज्वेलर्स आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण इथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याची भूमिका देशपांडे यांनी घेतली आहे.ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ : संदीप देशपांडे
मराठीची लाज वाटणाऱ्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ : संदीप देशपांडे वयोवृद्ध महिलेला मराठी बोला हे सांगण्यासाठी इथे आंदोलन करावं लागलं ही महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे. पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळलं आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. या माजलेल्या दुकानादाराला जर पोलीस किंवा सरकार सरळ करणार नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने शिकवणी द्यावी लागेल. पोलीस संरक्षणासाठी आहेत, दमदाटीसाठी नाहीत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आम्ही मराठीची शिकवणी देऊ आमच्या स्टाईलने हे त्यांनी यापुढे लक्षात ठेवावं. दुकानदाराने लवकरात लवकर माफी मागायला हवी, असं संदीप देशपांडे म्हणाले.
Agitation for Marathi | मराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाकडून अपमान, लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)