एक्स्प्लोर

ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ : संदीप देशपांडे

मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने लेखिका शोभा देशपांडे कालपासून रस्त्यावर ठिय्या देत आहे. या प्रकरणात आता मनसेनेही उडी घेतली आहे. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

मुंबई : मराठीत बोलण्याची विनंती केल्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाविरोधात लेखिका शोभा देशपांडे यांचा कालपासून रस्त्यावरच ठिय्या सुरु आहे. मुंबईतील कुलाब्यात घडलेल्या या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. "महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास लाज वाट असेल त्यांना आम्ही आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ," असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या महिलेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.

कालपासून ठिय्या सुरु केलेल्या शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली.

दुकानदाराने लवकरात लवकर माफी मागावी : संदीप देशपांडे वयोवृद्ध महिलेला मराठी बोला हे सांगण्यासाठी इथे आंदोलन करावं लागलं ही महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे. पोलिसांनी हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळलं आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. या माजलेल्या दुकानादाराला जर पोलीस किंवा सरकार सरळ करणार नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने शिकवणी द्यावी लागेल. पोलीस संरक्षणासाठी आहेत, दमदाटीसाठी नाहीत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आम्ही मराठीची शिकवणी देऊ आमच्या स्टाईलने हे त्यांनी यापुढे लक्षात ठेवावं. दुकानदाराने लवकरात लवकर माफी मागायला हवी, असं संदीप देशपांडे म्हणाले.

मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराकडून अपमान, लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या!

काय आहे प्रकरण? शोभा रजनीकांत देशपांडे काल (8 ऑक्टोबर) दुपारी त्या कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. मात्र त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून दिलं. यामुळे दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केल्याचा आरोप करत त्या काल दुपारपासून या दुकानासमोरील रस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. जोपर्यंत त्या ज्वेलर्स आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण इथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याची भूमिका देशपांडे यांनी घेतली आहे.

Agitation for Marathi | मराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाकडून अपमान, लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Embed widget