एक्स्प्लोर
‘भुजबळांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट’, दमानियांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या तक्रारीनंतर आता महाराष्ट्र कारागृह विभागाकडून यासंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भुजबळांविरोधात अंजली दमानिया यांचे नेमके आरोप काय?
‘छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आर्थर रोड कारागृहात टिव्हीवर हिंदी चित्रपट पाहतात. त्यांना चिकन मसाला यासारखे पदार्थ पुरवले जातात. एवढंच नव्हे, तर समीर भुजबळांना वोडका ही दारू देखील नारळपाण्यातून दिली जाते.’ असा आरोप अंजली दमानियांनी केला आहे.
अतिरिक्त कारागृह संचालक भुषणकुमार उपाध्याय यांना लिहिलेल्या पत्रात अंजली दमानियांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी याबाबत एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘जेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी मला याबाबत माहिती दिल्यानंतर मी याप्रकरणी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहलं. जवळजवळ जानेवारीपासून हा सर्व प्रकार सुरु आहे.’
याशिवाय भुजबळांना कोर्टात हजर करताना नियम धाब्यावर बसवून अनेक लोक त्यांना भेटतात असा आरोपही दमानियांनी केला आहे. त्याशिवाय जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या भूमिकेवरही दमानियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
संबंधित बातम्या:
भुजबळांसाठी जेलमध्ये टीव्ही, चिकन मसाला आणि वोडकाची सोय: दमानिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement