एक्स्प्लोर

भूमीपुत्रांसाठी रोजगाराची संधी; एमएमआरडीए कंत्राटदारांकडील 17 हजार पदांची भरती

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. एमएमआरडीए कंत्राटदारांकडील 17 हजार पदांची भरती करणार आहे.

मुंबई : भूमीपुत्रांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. स्थलांतरित मजुरांमुळे पायाभूत प्रकल्पांची विकासकामं रखडली आहेत. यासाठी राज्यातील तरुणांना रोगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. परंतु, राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडे सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदे भरली जाणार आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी

ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे 17 हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment - Job Seeker (Find a Job) - Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment - Job Seeker (Find a Job) - Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment - Job Seeker (Find a Job) - Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action - view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

Ashish Shelar | तीन पक्षांचं सरकार...खाटांची रोज कुरकुर; आशिष शेलार यांची ठाकरे-पवार भेटीवर टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget