एक्स्प्लोर
मुलाच्या हव्यासापोटी चिमुकलीची निर्घृण हत्या, नराधम बाप अटकेत
विरार: एकीकडे महाराष्ट्र पोलीस दलात पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीचा मान मिळवित महिला पोलीस अधिकारी मीना तुपे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केलेला असताना दुसरीकडे विरारमध्ये मात्र, मुलगी झाल्यानं तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विरारमधील पापडखिंड येथे वासुदेव चाळीत राहणाऱ्या कैलाश भांडे (वय ३० वर्ष) याचे एका वर्षापूर्वीच लग्न झाले होते. कैलाश वसईतील एक खाजगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी वैष्णवी ही गरोदर राहिल्यानंतर आपल्याला मुलगा पाहिजे. असा त्याने तगादा लावला होता. पण कैलाशच्या पत्नीने मुलीला जन्म दिला, यानंतर कैलाश तिला सतत मारहाण करत असे. 15 मे रोजी त्याने आपल्या पत्नीला मारहाण करून, घराबाहेर काढले आणि दीड महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून तिला ठार केलं.
मुलीला ठार केल्यानंतर त्याने पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सकाळी मृत मुलीला घेऊन तो डॉक्टरांकडे गेला आणि खोटी माहिती सांगून शवविच्छेदन टाळले आणि मुलीचा दफनविधी पार पाडला.
यानंतर कैलाशने पत्नीला आपण गावी जाऊन राहू असे सांगून, घर रिकामं केलं. त्यानंतर तो तिथून गावाला जाण्यासाठी निघाला. पण चर्चगेट स्थानकात, पाणी आणण्याचा बहाणा करून तो तेथून फरार झाला.
पत्नी गावी आपल्या वडिलाच्या घरी गेली आणि तिने सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी विरार येथे येऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी बापाच्या मुसक्या आवळल्या.
एकीकडे सरकार विविध योजनातून मुली वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना आजही कैलाश सारख्या प्रवृत्तीमुळे अनेक निष्पाप मुलींचे बळी जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement