एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कॅबनंतर ओलाची बस सेवा, एसी बस लवकरच मुंबईच्या रस्त्यावर
मुंबई : मोबाईल अॅपवर कॅब उपलब्ध करुन देणारी ओलाची आता एसी बसही लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. ओला मुंबई शहरात एसी शटल बसची सुरुवात करणार आहे. ही शटल सेवा पूर्णत: वातानुकूलित असेल.
ओला अॅपवर या बसचं बुकिंग करता येणार असून अगदी कमी दरात म्हणजेच 4 रुपये प्रति किमी पैसे आकारले जाणार आहेत. याचं सुरुवातीचं भाडं 49 रुपये असेल, असं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईत पीक अवर म्हणजे कामाच्या वेळात या बस चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचवतील. सकाळी 7 ते 11 दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान या बस धावतील. ही शटल सेवा मिरा-भाईंदर ते पवई, भाईंदर, भाईंदर-अंधेरी, भाईंदर ते बीकेसी मार्गावर सुरु केलं जाईल.
ओला सध्या शहरात कॅब सेवा देते. कंपनी लवकरच बस सेवाही मोबाईल अॅवर उपलब्ध करुन देणार असल्याचं ओलाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं. यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. शटलसेवेच्या भाड्यासह कोणत्या मार्गावर ही सेवा उपलब्ध होईल, हे पण निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं.
49 रुपयांत कूल-कूल प्रवास
ओलाची शटल सेवा 49 रुपयांत असेल, जी शहरातील इतर एससी बसच्या तुलनेत फारच स्वस्त आहे. बोरीवली-ठाण्याच्या एसी बस प्रवासासाठी साधारणत: 60 ते 80 रुपये लागतात. पण ओला शटलचं भाडं 49 रुपये असेल.
फोनवरच जागा आरक्षित
ओला शटलसाठी फोनमधील ओला अॅपच्या शटल मार्कवर क्लिक करुन आपल्या आवडीची जागा निवडू शकता. यानंतर शटल सेवेचा वेळ, जागेची माहिती मोबाईलवर येईल. या शटल सेवेत वाय-फायची सुविधा असेल, जेणेकरुन प्रवासादरम्यान प्रवाशांचं मनोरंजन होईल.
या मार्गांवर सेवा
मार्ग भाडं वेळ
भाईंदर-पवई 59 सकाळी 7.30
भाईंदर-ठाणे 59 सकाळी 7.20
भाईंदर-अंधेरी 49 सकाळी 7.45
भाईंदर-बीकेसी 75 सकाळी 7.30
अंधेरी-बीकेसी 49 सकाळी 8.45
पवई-ठाणे 49 सकाळी 9.00
बीकेसी-अंधेरी 49 रात्री 17.30
ठाणे-पवई 59 रात्री 8.30
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
Advertisement