एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 3 वर्षांत महिलांविरोधी एकाही तक्रारीत दोषारोप सिद्ध नाही
गेल्या तीन वर्षात महिला अत्याचार प्रतिबंधक पथकाकडे 1102 तक्रारींची नोंद झाली आहे. मात्र एकाही प्रकरणात आरोपीवर दोषारोप सिद्ध करण्यात या पथकाला यश मिळालेलं नाही.
मुंबई : देशभरात खटुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण गाजत असतानाच मुंबईत महिलांवरील अत्याचारासंदर्भात एक संतापजनक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात दाखल झालेल्या 1102 तक्रारींपैकी एकाही प्रकरणात आरोपीवर दोषारोप सिद्ध झालेला नाही.
आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षात महिला अत्याचार प्रतिबंधक पथकाकडे 1102 तक्रारींची नोंद झाली आहे. मात्र एकाही प्रकरणात आरोपीवर दोषारोप सिद्ध करण्यात या पथकाला यश मिळालेलं नाही.
तक्रारींपैकी सर्वाधिक म्हणजे 401 तक्रारी घरगुती छळ, 166 लैंगिक छळ, तर 102 तक्रारी या महिलांविरोधीच आहेत.
महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिस अंतर्गत 2012 साली हे विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. पाच वर्षानंतरही या पथकाला पुरेसं मनुष्यबळ दिलं गेलं नाही. सध्या 12 पैकी फक्त 3 पीएसआय किंवा एपीआय पदाचे अधिकारी कार्यरत आहेत. तर एकूण 77 पैकी फक्त 31 पदं भरली गेली आहेत. यावरुन महिला सुरक्षेबाबत शासन किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं.
महिला आणि बाल कल्याण मंत्री यांनी हा गृह विभागाचा विषय असल्याचं सांगत हात झटकले. त्याचबरोबर नोंद करुन दखल घेतलेल्या तक्रारींची संख्या वाढत असल्याचंही नमूद केलं. मात्र या पथकाकडून गुन्हे सिद्ध का होत नाहीत, याबद्दल माहिती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement