एक्स्प्लोर
Advertisement
माझी गाडी कुणीही अडवली नाही : नितेश राणे
‘माझी गाडी कुणीही अडवली नाही.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मोर्चेकऱ्यांनी गाडी अडवल्याचं वृत्त फेटाळलं आहे.
मुंबई : ‘माझी गाडी कुणीही अडवली नाही.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मोर्चेकऱ्यांनी गाडी अडवल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मात्र, असं असलं तरी राणेंच्या गाडीवर चढून मोर्चेकऱ्यांनी आंदोलन केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
नितेश राणेंची प्रतिक्रिया
‘माझी गाडी अडवली ही माहिती चुकीची आहे. कुणीही माझी गाडी अडवली नाही. आझाद मैदानातील मोर्चा संपल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर नेते निघून गेले. पण मी तिथं शेवटपर्यंत हजर होतो. पण यावेळी मोर्चामधील काही जणांना सरकारचं निवेदन हे लेखी स्वरुपात हवं होतं. मी तिथं असल्यानं त्यांनी तशी मागणी माझ्याकडे केली. राज्यभरातून अनेक तरुण मोठ्या अपेक्षेनं आले होते. त्यामुळे त्यांना असं एकटं सोडणं मला चुकीचं वाटलं.’ ‘काही जणांनी मला विनंती केली की, आपण आझाद मैदान ते विधानभवन चालत जाऊन लेखी निवदेन घ्यावं. त्यांच्या या मागणीचा सन्मान करत आम्ही विधानभवनापर्यंत चालत गेलो. त्यानंतर निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आम्ही घेतला. तेथील नेत्यांसोबतही त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर ते तिथून निघाले.’ ‘मला माहिती आहे की, मराठा समाजातील काही तरुण आक्रमक आहेत. पण त्यावेळी मी त्यांना संभाळलं. मोर्चावेळी व्यासपीठावरील असणारे नेते लागलीच निघून गेले. पण मी तिथं शेवटपर्यंत थांबलो. मी दिलेला शब्द पाळला.’ अशी माहिती नितेश राणेंनी दिली.दरम्यान, यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी असा दावा केला आहे की, 'आमदार नितेश राणेंनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला विधानभवनपर्यंत नेऊन लेखी निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का मिळवून दिला. त्यांची गाडी अडवण्यात आली होती. पण तो आमचा ग्रुप नव्हता.' काय आहे नेमकं प्रकरण? ‘मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर व्यासपीठावर आलात आता मराठा आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन द्या.’ अशी मागणी करत मोर्चेकरांनी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची कार आझाद मैदान जवळील परिसरात अडवली. मोर्चा संपल्यानंतर नितेश राणे व्यासपीठावर आले होते. त्यामुळं काहीशा चिडलेल्या मोर्चेकरांनी मोर्चा संपल्यानंतर नितेश राणेंची कार अडवून लेखी आश्वासनाची मागणी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यानं त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन नितेश राणेंना गाडीतून बाहेर काढलं आणि दुसरीकडे नेलं. मात्र, तरीही मोर्चेकरांनी त्यांच्या गाडीभोवती घेराव कायम ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने जी आश्वासन दिले त्याच्या लेखी आश्वासनाची मागणी मोर्चेकरांनी नितेश राणेंकडे केली. त्यानंतर नितेश राणेंनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना विधान भवनात नेलं. संबंधित बातम्या : मराठा मोर्चेकऱ्यांनी नितेश राणेंची गाडी अडवली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement