एक्स्प्लोर
नितेश राणेंची 'चेहराफेरी', व्हिडिओतून उद्धव ठाकरेंना चिमटे
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षयच्या चेहऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा चेहरा मॉर्फ केला आहे, तर परेश रावलच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चेहरा लावला आहे.
मुंबई : फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देणाऱ्या शिवसेनेला आमदार नितेश राणे यांनी चिमटे काढले आहेत. ट्विटरवर 'हेराफेरी' चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिओ शेअर करुन नितेश राणेंनी निशाणा साधला आहे.
हेराफेरी चित्रपटात परेश रावल (बाबूभैया) आणि अक्षय कुमार यांच्यात घरभाड्यावरुन वाद होतानाचा सीन आहे. त्यात अक्षय कुमार परेश रावलला घर सोडून जाण्याची धमकी देत असतो. अखेरीस मी दोन वर्षांचं भाडं भरणार, मी जाणार नाही, असं सांगत तो घरात जातो. तेव्हा हा काही जायचा नाही, असं परेश रावल म्हणतो.
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षयच्या चेहऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा चेहरा मॉर्फ केला आहे, तर परेश रावलच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चेहरा लावला आहे. तर सुनिल शेट्टीच्या चेहऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चेहरा मॉर्फ केला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/935495570944380928
हा व्हिडिओ आपण तयार केला नसून ज्याने कोणी केला आहे, तो जिनिअस आहे आणि प्रासंगिकही, असं नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/935517688163643393
उद्धव ठाकरेंनी अनेकवेळा सत्ता सोडण्याची भाषा केली आहे. मात्र तरीही दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र नांदत आहेत. शिवसेनेला त्रास होत असल्यास त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, असा सल्ला विरोधकांनीही अनेकदा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement