एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nitesh Rane Letter to CM : महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात खळबळजनक आरोप

Nitesh Rane Letter to CM : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलंय.

Nitesh Rane Letter to CM : भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळं सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. महापौरांनी मुलुंडमधील क्रिडा संकुल, जलतरण तलाव आणि अंधेरेतील शहाजीराजे भोसले क्रिडा संकुलाच्या खाजगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याप्रकरणी लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलंय. मुलुंडमधील क्रिडा संकुल, जलतरण तलाव आणि अंधेरेतील शहाजीराजे भोसले क्रिडा संकुलाच्या खाजगीकरणाचा महापौरांचा डाव असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ललितकला प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांच्या हस्तक्षेपानं हा खाजगीकरणाचा घाट घातल्याचं नितेश राणेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर, विशेष कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांची चौकशी करुन खाजगीकरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ललितकला प्रतिष्ठानचे एक हजार कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू अशा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. 

नितेश राणेंनी पत्रात काय म्हटलंय? 

पत्रात नितेश राणेंनी म्हटलंय की, "शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती आणि त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. मुंबई फक्त धन दांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकारांनाही खेळासाठी मैदानं, जलतरण तलाव, उद्यानं पहायला मिळावीत त्याचा लाभ घेता यावा तिथे आपली कौशल्य विकसित करता यावीत यासाठी त्यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. पण आता खुद्द बाळासाहेबांनी स्थापना केलेल्या प्रतिष्ठानलाच भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करतायेत."

"या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता रहावी म्हणून यावर महापालिकेचे नियंत्रण असावे असे बाळासाहेबांना वाटले होते म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीस करुन ठेवली. यात सदस्य म्हणून कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबांचा हेतू स्पष्ट होता. पण आता तसं राहिले नाही. या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्र कुमार जैन नियुक्त झाल्या-झाल्याच स्विमिंग पूल आणि बॅटमिंटन कोर्ट यांच्या खासगीकरणाचा घाट घातला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे या महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही.", असं नितेश राणेंनी पत्रात म्हटलंय. 

"एकदा खासगी करण झालं की, यात काम करणाऱ्या 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना उद्धवस्त केलं जाणार हे स्पष्ट आहे. त्यातील निम्मे हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानची आहे. यामुळे नफ्यात चालणाऱ्या तरण तलावाचे खासगीकरणच कशासाठी? व कुणासाठी? हे जलतरण तलावाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी व हे खासगीकरण थांबवावे अन्यथा आम्ही प्रतिष्ठानचे 1000 कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरु" असा इशाराही नितेश राणेंनी पत्रातून दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget