एक्स्प्लोर
‘खंबाटा’विरोधात दमानियांची पोलिसात तक्रार, राणेही पोलिस ठाण्यात
![‘खंबाटा’विरोधात दमानियांची पोलिसात तक्रार, राणेही पोलिस ठाण्यात Nitesh Rane Anjali Damania Registered Complaint Against Cambata Aviation ‘खंबाटा’विरोधात दमानियांची पोलिसात तक्रार, राणेही पोलिस ठाण्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11234817/anjali-damaniya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : खंबाटा एव्हिएशन कंपनीचा वाद आता मुंबई पोलिसांकडे गेला आहे. तब्बल 2100 कामगारांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीविरोधात अंजली दमानिया यांनी सहार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
अंजली दमानियांनी सहार पोलिस स्टेशन जाऊन तक्रार दाखल केली. दमानियांपाठोपाठ काँग्रेस आमदार नितेश राणेही सहार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
दरम्यान खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देणी त्वरीत द्यावी, यासाठी अंजली दमानिया यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
खंबाटा एव्हिएशन कंपनीकडून कामगारांचे वेतन देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांच्यावरही कामगारांचं अहित करण्याचे आरोप केले होते.
VIDEO : अंजली दमानियांनी काल नितेश राणेंवर काय आरोप केले होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)