एक्स्प्लोर

अंबानींच्या घराबाहेर घटनेचं नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावलं

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर NIA ने घटनेचे नाट्यरुपांतर केले. अंबानी यांच्या घराबाहेर सीसीटिव्हीत कैद झालेला व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे.

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी सध्या एनआयए ही तपास यंत्रणा संशयित आरोपी सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर सचिन वाझे यांना आणून घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्याप्रमाणे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे रुपांतर चालू होते.

कसे होते नाट्यरुपांतर?
स्फोटकं ठेवल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून पीपीई किट सदृष्य झब्बा घालून एक व्यक्ती मागील बाजून उतरुन निघून गेला होता. हे सर्व दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं आहे. ही व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या व्यक्तीची चाल ही सचिन वाझे यांच्या सारखी आहे का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांनी घटनास्थळी आणून फुटेजमधील व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगण्यात आले होते. 

यासाठी अगोदर सर्व ठिकाणी मार्किंग केलं होतं. घटना रात्रीच्या असल्याने हे नाट्यरुपांतरासाठी रात्रीची वेळ निवडल्याचे सांगितले जाते. सचिन वाझे यांची नैसर्गिक चाल ओळखण्यासाठी त्यांना अनेकदा चालण्यास सांगितलं जात होतं. हे सर्व कैद करण्यासाठी कॅमेराही सीसीटिव्ही रिझोल्युशनचा वापरल्याची माहिती मिळत आहे. यासाठी कॅमेरा शिडीच्या माध्यमातून सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या उंचीवर लावला होता.

सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये विशिष्ठ ठिकाणावरुन चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना कुर्ता घालूनही दोनतीन वेळा चालायला लावले. यावेळी त्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला पहायला मिळाला. हे सर्व नाट्यरुपांतर संग्रहित करण्यासाठी पुण्यावरुन खास फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने हे सर्व पुरावे आपल्या सोबत तपासासाठी घेतले आहेत. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते.

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ
सचिन वाझेंच्या अडचणीत आता आणखीन वाढ होण्याची चिन्ह आहेत. सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नाही. एनआयएनं मुंबई सत्र न्यायालयात याचा पुनरूच्चार केला आहे. तसेच परवानगी देऊनही सचिन वाझेंचे वकील चौकशीच्यावेळी उपस्थित राहत नसल्याचं एनआयएनं कोर्टाला सांगितलं आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. तर ठाणे सत्र न्यायालयाकडनं शुक्रवारी एटीएसला वाझेंचं प्रॉडक्शन वॉरंट जारी केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chhagan Bhujbal : ...तर छगन भुजबळ शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते?Zero Hour Guest Center Sushma Andhare :छगन भुजबळ मराठा-औबीसी वादाचे बळी. सुषमा अंधारेंनी सगळंच काढलंZero Hour on Chhagan Bhujbal : मला खेळणं समजले का? भुजबळ आक्रमक, अजित पवारांवर संतापलेZero hour Uddhav Thackeray and Devendra Fadnavis:उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Video: विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Embed widget