एक्स्प्लोर
मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्कवर भाजपकडून नवीन सेल्फी पॉईंट उभारला जाणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा सेल्फी पॉईंट उभारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट मनसेकडून नुकताच बंद करण्यात आला होता.
"दादर शिवाजी पार्कवरील तरूणाईचे आकर्षण ठरलेला Selfie Point आता
भाजपा अधिक आकर्षक पद्धतीने उभारणार!! लवकरच भेटू Selfie Point वर!!"
अशा सांगत आशिष शेलारांनी नव्या सेल्फी पॉईंटची घोषणा केली आहे.
महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट बंद केला.मुंबईतल्या या पहिल्या सेल्फी पाँईंटला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. पण देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणं कठीण असल्यानं हा सेल्फी पॉईंट बंद केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क भागात नगरसेवक असताना सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला होता. मुंबईतील पहिलाच अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट असल्याने तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. यावेळी संदीप देशपांडेच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यांनंतर अगदी काही दिवसातच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी निधी उपलब्ध होत असल्याचं कारण देत सेल्फी पॉईंट बंद केला. संबंधित बातम्या :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement