एक्स्प्लोर

माहुलमध्ये प्रकल्पबाधितांचं होणारं पुनर्वसन थांबवा, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या : हायकोर्ट

हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही राज्य सरकारने प्रकल्पबाधितांचं दुसरीकडे पुनर्वसन आणि ठरलेलं भाडं दिलेलं नसल्याने माहुलवासिय पुन्हा हायकोर्टात आले होते. या नव्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सोमवारी आपला अंतिम निकाल जाहीर केला.

मुंबई : प्रदूषणाने वेढलेल्या माहुलमध्ये यापुढे कुठल्याही प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन करु नका असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जारी केले आहे. तसेच ज्यांचं माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आलं आहे त्यांना पर्यायी जागा तातडीने उपलब्ध करुन देण्यचे आदेश दिले आहेत. एप्रिल 2019 मध्ये दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रदुषणाच्या मुद्यावर माहुलमधील घर परत करुन दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना दरमहा 15 हजार रुपये मासिक भाडं आणि डिपॉझिट म्हणून वार्षिक 45 हजार रुपयांची रक्कम द्या, हे आदेश हायकोर्टाने कायम ठेवलेत. हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही राज्य सरकारने प्रकल्पबाधितांचं दुसरीकडे पुनर्वसन आणि ठरलेलं भाडं दिलेलं नसल्याने माहुलवासिय पुन्हा हायकोर्टात आले होते. या नव्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सोमवारी आपला अंतिम निकाल जाहीर केला. तसेच हे आदेश पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला 12 आठवड्यांचा अवधी देत ही याचिका निकाली काढली. मुंबई उच्च न्यायालयाच्या एप्रिलमधील निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच हरित लवादाने माहुलला राहण्यासाठी अयोग्य ठरवल्याच्या निर्णयालाही राज्य सरकारनं हायकोर्टात आव्हान दिलं असल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सध्यातरी हायकोर्टाच्या आधीच्या निकालाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. तेव्हा हायकोर्टाच्या निर्देशांची अंमलबजावणी ही व्हायलाच हवी, असं मत व्यक्त करत मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान राज्य सरकारची बरीच कानउघडणी केली होती. VIDEO | प्रकल्पबाधित माहुलवासियांना हायकोर्टाचा दिलासा | चेंबुर, मुंबई | एबीपी माझा काय आहे प्रकरण? मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा पाईपलाईन लगत बेकायदा झोपड्या आहेत. पाईपलाईनपासून 10 मीटर अंतरावरील झोपड्या तोडण्याचे आदेश न्यायालयाने जनहित मंचतर्फे दाखल याचिकेत दिले होते. त्यानुसार पालिकेतर्फे अनेक झोपड्यांवर कारवाई केली गेली. कारवाईतनंतर या रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेशही हायकोर्टाने राज्यसरकारला दिले होते. त्यानुसार प्रकल्पबाधित रहिवाश्यांचे माहुलमध्ये  पुनर्वसन करण्यात आले. परंतू माहुल येथे प्रदूषणाचं प्रमाण जास्त असल्याने रहिवशांनी त्याला विरोध केला आहे. घाटकोपर पाईपलाईनवरील कारवाईनंतरच्या पुनर्वसनात माहुलवासिय झालेल्यांच्याबाबतीत आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालाची दखल घेत तिथे इमारतींची दुरुस्ती, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधेची कामं तातडीने हाती घेतली आहेत. त्याचबरोबर एचपीसीएल आणि बीपीसीएल या नजीकच्या आरसीएफ पेट्रोकेमिकल्स प्लांटमधून निघणाऱ्या घातक वायुंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांना परदेशी बनावटीची अद्ययावत यंत्रणा बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती यावेळी सरकाराने कोर्टाला दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget