एक्स्प्लोर
दर्गा प्रवेश वाद : शेख यांची भूमिका शिवसेनेची नाही : निलम गोऱ्हे
मुंबई : शिवसेना नेते हाजी अराफत शेख यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दिलेला इशारा हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, ती पक्षाची भूमिका नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी दिलं आहे.
तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ अशी धमकी हाजी अराफत शेख यांनी दिली आहे. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.
तृप्ती देसाई दर्ग्यात आल्यास चपलाचा प्रसाद देऊ : हाजी अराफात
"मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देण्यात येईल असं पत्रक शिवसेना नेते हाजी अराफत शेख यांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही. मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष आणि सर्वांनाच समान अधिकार असावेत ही शिवेसनेची भूमिका आहे. पुरुषांना सर्व धार्मिक स्थळांमध्ये जे अधिकार आहेत ते सर्व स्रियांनाही असावेत. तसेच न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार आणि पोलीसांनी करायलाच हवी, ही वस्तूस्थिती आहे. सरकारकडून याच पालनाची अपेक्षा आहे. म्हणूनच महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशास कोणत्याही प्रकारे विरोध करणे योग्य नाही. हाजी अराफत शेख यांचं मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही याची समज त्यांनाही पक्षाने दिलेली आहे" अशी भूमिका शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.संबंधित बातम्या
तृप्ती देसाई दर्ग्यात आल्यास चपलाचा प्रसाद देऊ : हाजी अराफात
आता हाजी अली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचा एल्गार !
हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, राज्य सरकारची भूमिका
हाजी अली दर्गा प्रवेशासाठी मुस्लिम महिलांचा एल्गार
हाजी अली दर्गा बंदीविरोधात एल्गार, मुस्लिम महिला संघटना हायकोर्टात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement